आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:केस वाळवण्यासाठी टेरेसवर गेली, पाय घसरून कोसळताना तिसऱ्या मजल्यावरील ग्रीलला धरून ठेवले, थरारक सुटका!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी केस वाळवायला छतावर गेली. अचानक पाय घसरून ती कोसळली. सुदैवाने ती तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या लाेखंडी जाळीवर अडकली. ती ग्रील तिने घट्ट धरून ठेवली. एकच हलकल्लोळ उडाला. अग्निशमन दलाच्या जवानांची प्रयत्नांची शर्थ करून तिची सुखरूप सुटका केली... ही घटना पुण्यातील शुक्रवार पेठेत सोमवारी घडली. गणेश अपार्टमेंटमध्ये ही १४ वर्षांची मुलगी सकाळी ९ च्या सुमारास छतावर गेली होती. काेसळून ग्रीलला फसल्यानंतर तिने जोरजोरात रडायला सुरुवात केली. हे कळताच लोक जमा झाले. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांनी शिताफीने तिची सुटका केली.

अशी केली सुटका : एका महिलेने खिडकीतून सोडलेली साडी धरून मुलगी लटकलेली होती. जवानांनी इमारतीच्या तळमजल्यावर आधी जाळी लावली. शिडी मात्र तिथपर्यंत पुरली नाही. त्यानंतर मुलीला सोडवण्यासाठी इमारतीच्या छतावरून दोर सोडण्यात आला. दोराच्या साहाय्याने जवान उतरले आणि मधोमध अडकलेल्या मुलीची सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...