आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छा तेथे मार्ग!:पुणे अग्निशमन दलाच्या 3 जवानांनी दहावी परीक्षेत मिळवले यश, सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणित विषयात १९८८ मध्ये नापास झालेल्या विजय चौरे यांनी यंदा परीक्षेत यश मिळवले.  - Divya Marathi
गणित विषयात १९८८ मध्ये नापास झालेल्या विजय चौरे यांनी यंदा परीक्षेत यश मिळवले. 

शिकण्याची जिद्द बाळगत पुणे अग्निशमन दलाच्या तीन जवानांनी दहावीच्या परिक्षेत यश मिळवले. आयुष्यभर आग व आपत्तीशी झुंजणाऱ्या या जवानांनी शिक्षणाशीही झुंज देत हे अनोखे यश मिळवले.

गणित विषयात १९८८ मध्ये नापास झालेला जवान तांडेल विजय चौरे यांनी तब्बल ३४ वर्षांनी पुन्हा या विषयाची परिक्षा देत यंदा गणितात 53 गुण पटकावले. अग्निशमन अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त असलेले त्यांचे वडिल लक्ष्मण चौरे व कुटुंबीयांनी याबाबत अभिमानाच असल्याचे म्हटले आहे. तर, फायरमन गणेश लोणारे यांनादेखील मागील वर्षी दहावीत यश मिळाले नाही. तरीदेखील न डगमगता त्यांनी जिद्दीने यावर्षी यश संपादन केले. तर, फायर इंजिन ड्रायव्हर असलेले योगेश जगताप यांनीदेखील यावर्षी दहावीचा अर्ज भरुन पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत परीक्षेत यश मिळवलेल्या या जवानांचा जसा कुटुंबीयांना अभिमान आहे तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांनाही त्यांचे कौतुक वाटत आहे. या यशाबद्दल अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. इच्छा तेथे मार्ग, या विचारानुसारच या जवानांनी नोकरी व प्रपंच सांभाळत दहावीत उत्तम यश मिळवले.

बातम्या आणखी आहेत...