आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पुन्हा आगडोंब:गोदामाला भीषण आग, अनेक सिलिंडरचे स्फोट, परिसरात काळ्या धुराचे लोट

पुणे | प्रतिनिधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अहमदनगर रस्त्यावर वडगाव शेरी परिसरात सोपान नगर येथे एका गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

आगीमुळे आकाशात मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ तसेच काळे धुराचे लोट निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे या गोडाऊनमध्ये अनेक सिलिंडर असल्याची माहिती आहे. आगीमुळे हे सिलेंडर फुटत असल्याने मोठा आवाज होऊन आग भडकत आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप उलगडा झाला नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

तसेच, या आगीत कोणीही जखमी झाले नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

आगीमुळे आकाशात काळे धुराचे लोट
आगीमुळे आकाशात काळे धुराचे लोट

पहाटे दवाखान्याला आग

दरम्यान, पुण्यातील दुसऱ्या एका घटनेत आज पहाटे एका बंद असलेल्या क्लिनिकला आग लागली. पहाटे साडेचार वाजता कोंढवा बुद्रुक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धन्वंतरी क्लिनिकमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर तत्परतेने कोंढवा बुद्रुक येथील अग्निशमन दल दाखल होत आग आटोक्यात आणली.

या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, आगीत क्लिनिकमधील संपुर्ण फर्निचर, इलेक्ट्रीक वायरिंग, मेडिसीन व कागदपत्रे जळाली असून मोठे नुकसान झाले आहे. आगीचा प्रकार मध्यम स्वरुपाचा असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन केंद्रामधील वाहन चालक रविंद्र हिवरकर, जवान योगेश पिसाळ, किशोर मोहिते, रफिक शेख व मदतनीस प्रथमेश निकम यांनी ही आग आटोक्यात आणली.

बातम्या आणखी आहेत...