आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील उंड्री येथील घटना:अज्ञातांनी जीम पेटवून दिली; भीषण आगीत साडेसात लाख रुपयांचे नुकसान

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील उंड्री येथील बिशप शाळेसमोर एका जिम मध्ये आज्ञत इसमाने पेट्रोल टाकून आग लावून जिम जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत जिम मधील सात लाख ५५ हजार रुपयांचे साहित्य जळून आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

याप्रकरणी दीपक देविदास देवकर (वय -27, रा. हांडेवाडी, पुणे )यांनी अज्ञात आरोपी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .सदरचा प्रकार तीन एप्रिल रोजी मध्यरात्री तीन वाजता घडला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार दीपक देवकर यांची उंड्री परिसरात होले वस्ती रोड याठिकाणी बिशप शाळेसमोर आयकॉनिक फिटनेस या नावाने जिम आहे.

ही जीम रात्री बंद करून ते घरी गेले असताना, रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान जिम मधून धूर येत असल्याची माहिती स्थानिकांनी देवकर यांना कळवली होती. त्यानंतर तातडीने देवकर हे घटनास्थळी आले असता, जिम मधील साहित्याने पेट घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे अग्निशामक दलास ही घटनास्थळी बोलवण्यात आले.

अग्निशामक दलाने सदर आग आटोक्यात आणली. मात्र, जिम मधील सात लाख 55 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सदर आर्थिक नुकसान केल्याने याप्रकरणी अज्ञात आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस बिराजदार करत आहेत.

गाडी ओव्हरटेक करण्याच्या वादातून मारहाण

कोंढवा येथे राहणारे बंडू बोराडे ( वय- 36 )हे त्यांच्या कारमधून जेवण करण्यासाठी कॅम्प परिसरात गेले होते. त्यावेळी काही दुचाकी वाहनांवरील पाच ते सहा जणांना त्यांनी ' मला कशाला ओव्हरटेक करता, गाड्या सावकाश चालवा असे सांगितले' या गोष्टीचा राग येऊन सदर आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांची गाडी थांबवून त्यांना शिवीगाळ केली. तसेच गाडीच्या सर्व काचा फोडून, त्यांच्या डोक्यात दगड घालून तसेच हॉकी स्टिकने भुवईजवळ मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी पाच ते सहा अज्ञात इसमावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार दोन एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान कॅम्प परिसरात घडला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.