आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्याच्या रुग्णालयात आग:​​​​​​​कॅंट परिसरातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, रुग्णांना सुरक्षित काढले बाहेर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आग विझवण्यात आली आहे आणि सुदैवाने यामध्ये कुणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही
  • असे मानले जात आहे की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असेल, तपास सुरू आहे

शनिवारी दुपारी कॅंट भागातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. ताज्या माहितीनुसार आग विझविण्यात आली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कॅंट फायर स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वार्डात आग लागली होती ती जागा सध्या रिकामी करण्यात आली आहे. त्यापुढे ऑपरेशन थिएटर होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ही आग लेव्हल 1 ची होती. अग्निशामक दलाच्या तीन फायर टेंडर अजूनही घटनास्थळी हजर आहेत.

ऑपरेशन थिएटरच्या शेजारी असलेल्या वॉर्डात ही आग लागली होती. ज्यानंतर येथे पुढील आदेशापर्यंत ऑपरेशन करण्यात बंदी घालण्यात आली आहे. आगीची माहिती कळताच संपूर्ण रुग्णालय रिकामे करण्यात आले आहे. कमी गंभीर रुग्णांना रुग्णालयाबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.