आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरातील विमाननगर भागातील प्रसिद्ध आयटी बिझनेस हब या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. सदर आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यावेळी आयटी बिझनेस हबमधील दोन हजार कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
विमाननगर परिसरातील आयटी बिझनेस हबमधील एका मजल्यातून मोठ्या प्रमाणावर अचानक धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि पाऊण तासात आग आटोक्यात आली.
आग लागल्याची माहिती मिळाल्यावर, माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.आयटी बिझनेस हबमधील तळघरातील इलेक्ट्रीक खोलीत आग लागली होती.त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने सदरचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने धावपळ झाली. त्यामुळे आयटी हबमधील दोन हजार कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला आहे.
चित्रपटाचे रिव्ह्युव्ह वाढवण्याच्या टास्कच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक
वॉट्सअॅपवर पार्ट टाईम जॉबसाठी मॅसेज टाकून चित्रपटाचे रिव्ह्युव्ह वाढविण्याचे टास्क पूर्ण करण्यास देऊन वेळोवेळी खात्यावर 21 लाख 33 हजार रूपये स्विकारून फसवणूक केल्याप्रकरणी मोबाईल धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भुषण सुभाष मेटे (42, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 6 डिसेंबर ते आतापर्यंत घडला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.