आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्रांतवाडीतील घटना:इमारतीच्या गच्चीवर मोबाईल टॉवरला आग; अग्निशामक दलाच्या जवानांनी मिळवले आगीवर नियंत्रण

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्रांतवाडी परिसरात एका सहा मजली इमारतीच्या गच्चीवर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर तसेच केबल्स आणि नियंत्रण कक्ष यांना आग लागून नुकसान झाल्याची घटना रविवारी घडली.

दुपारी ३.३० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात विश्रांतवाडी, कस्तुरबा को ऑप हौसिंग सोसायटी, विजयशांती हाईटस या इमारतीत आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तळमजला+पाच मजली इमारतीत वर गच्चीवर असणारया एका मोबाईल टॉवर व त्याच कंपनीच्या नियंत्रण कक्षात भीषण आग लागली आहे.

जवानांनी तातडीने इमारतीमधील सर्व रहिवाशी सुरक्षित असल्याची प्रथम खाञी करुन पाचव्या मजल्यावर गच्चीवर होज पाईप घेऊन जात पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. इमारतीमधे जीन्यामधे अडगळीचे सामान व आग गच्चीवर असल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत धोका दूर केला. आगीचे नेमके कारण समजले नसून आगीमधे केबल, मोबाईल टॉवर व नियंञण कक्ष पुर्ण जळाले आहे. सदर टॉवर हा रिलायन्स कंपनीचा असल्याचे समजले.

या कामगिरीत धानोरी अग्निशमन केंद्र अधिकारी सोपान पवार व वाहनचालक रघुनाथ भोईर, शंकर गायकवाड तसेच तांडेल भाऊसाहेब चोरमले, अंकुश पालवे व जवान रोहिदास टिंगरे, विठ्ठल आढारी, आकाश राठोड, सुरज निवळकर, अमोल रणदिवे यांनी सहभाग घेतला.

विशेष कामगिरी

अग्निशमन दलाकडील कंञाटी पद्धतीवर कार्यरत वाहनचालक व विश्रांतवाडी येथील रहिवाशी शाहनवाज सय्यद यांचा रोजा सुरू असताना ते ही घटना समजताच अग्निशमन वाहन येण्याआधी वर्दिवर पोहोचले व त्यांनी इमारतीमधील रहिवाशांना इमारतीतून बाहेर पडण्याच्या सुचना देत पाचव्या मजल्यावरील घरातून एक सिलेंडर बाहेर काढून धोका दूर केला व जवानांना आग विझवण्यात मदत केली.