आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना परिणाम:फटाका विक्रीत 50 टक्क्यांची घट, खरेदीला अल्प प्रतिसाद दिल्यामुळे विक्रेते हवालदिल

पुणे4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

दिवाळी आणि फटाके हे समीकरण ठरलेलेच. मात्र, मागील काही वर्षांपासून हे समीकरण बदलले आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे अलीकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यात यंदा कोरोनामुळेही नागरिकांची आर्थिक स्थितीही बिकट आहे. त्यामुळे याचाच फटका यंदा फटाका विक्रीला बसला आहे. पुणेकरांनी फटाका खरेदीला अल्प प्रतिसाद दिल्यामुळे विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत.

फटाके उडवणे अनेकांच्या जिवावर बेतल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दिवाळीदरम्यान तर अशा घटना प्रकर्षाने घडताना दिसून येतात. फटाक्यांच्या वापरामुळे पक्ष्यांना, प्राण्यांनाही त्रास होतो हे अनेकदा सिद्ध झाले. त्याचबरोबर पर्यावरणालाही फटाक्यांमुळे हानी होत असते. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यात यावी, असे आवाहनही करण्यात येत असते. वरील सर्व गोष्टींमुळे नागरिकांनी फटाक्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र फटाके विक्रेत्यांना बसला आहे. विक्रीसाठी आणलेल्या फटाक्यांचे काय करायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे कमी दरात का होईना हे फटाके विक्रीकडे त्यांचा कल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चायनीज फटाके बाजारपेठेत नाहीत
बाजारात दरवर्षी चायनीज फटाकेही उपलब्ध असतात. परंतु यंदा पुण्यातील फटाक्यांच्या बाजारपेठेत कुठेही चायनीज फटाका दिसत नाही. चायनीज फटाके स्वस्त असल्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी असते. त्याची गुणवत्ता चांगली नसली तरी स्वस्त असल्यामुळे नागरिक हे फटाके खरेदी करतात. पण या वर्षी आम्ही चायनीज फटाके मागवले नाहीत, असे कैलास सोनवणे म्हणाले.

लहान मुलांमुळे काही प्रमाणात विक्री : पुण्यातील फटाका विक्रेते कैलास सोनवणे म्हणाले, कोरोनाचा परिणाम फटाके विक्रीवरही झाला आहे. फटाक्यांच्या विक्रीत ५० ते ६० टक्के इतकी घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...