आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार:राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर चिंचवड येथे गोळीबार, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुदैवाने कुणीही जखमी नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.

पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. गोळीबार का केला याचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...