आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:आधी पैशाबाबत विचारणा, आता नरेंद्र मोदींचे कौतुक; सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी केले दुसऱ्या दिवशीही ट्विट

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत सरकारकडे पुढील एक वर्षात लसीकरिता ८० हजार कोटी रुपये उपलब्ध आहेत का? असा सवाल विचारला होता

सीरम इन्स्टिटयूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य विभागाकडे भारतीयांना लस खरेदी करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत का ? अशी विचारणा शनिवारी टि्वटरद्वारे केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी परत एक ट्वीट करून पूनावाला यांनी मोदींच्या संपूर्ण जगाला लस पुरवण्याच्या प्रयत्नाचे व त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. त्यामध्ये पूनावाला यांनी मोदींची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भाषणाची क्लिपदेखील शेअर केली आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटात भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक आहे. जगाला या महामारीतून बाहेर काढण्यासाठी भारताची लस आणि उत्पादन व वितरण क्षमता कामी येईल, असे शनिवारी म्हटले होते. त्यानंतर अदर पूनावाला यांनी शनिवारी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्य विभागाला टॅग करत एक ट्विट केले होते. भारत सरकारकडे पुढील एक वर्षात लसीकरिता ८० हजार कोटी रुपये उपलब्ध आहेत का? कारण भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागास लस खरेदी करून तिचे वितरण देशातील प्रत्येक नागरिकास करायचे आहे असे या ट्वीटमध्ये म्हटले होते. त्यानंतर एक तासानेच दुसरे ट्विट करत लस देण्यासाठी नियोजन करण्यासाठी हा प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी पहिल्या ट्वीटचे समर्थन केले होते. हे ट्वीट म्हणजे थेट मोदी आणि केंद्रीय आरोग्य विभागाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे होते. सीरम संस्था ही जगातील सर्वात माेठी लस उत्पादन करणारी कंपनी असून काेविशीलड लस निर्मितीच्या तिसऱ्या टप्प्याची मानवी चाचणी सध्या ती करत अाहे. दरम्यान, सीरमच्या तिसऱ्या मानवी चाचणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. मुंबईतही ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना सीरमच्या या लसीकडून खूप अपेक्षा आहेत. देशासह परदेशातही या लसीची अनेक जण वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

काय म्हटले ट्वीटमध्ये

‘नरेंद्र मोदीजी, तुमच्या संपूर्ण जगाला लस पुरवण्याच्या दूरदृष्टीचे आम्ही कौतुक करतो. ही बाब भारतासाठी अभिमानास्पद आहे. तुमचे नेतृत्व आणि मदतीबाबत आभार व्यक्त करतो. याद्वारे तुमची तयारी ही सर्व भारतीयांची गरजांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, असे दिसून येत असून त्याबाबत काही शंका नाही.’

बातम्या आणखी आहेत...