आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभेच्छा:कोविंद यांना ‘इंडो ग्लोबल सिनारियो  फ्रॉम 2022  टू 2047’ पुस्तिकेची प्रथम प्रत भेट

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे कोविंद यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा व नावीन्यपूर्ण अशा ‘इंडो ग्लोबल सिनारियो फ्रॉम २०२२ टू २०४७’ पुस्तिकेची प्रथम प्रत भेट दिली. या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तिकेमध्ये आतापर्यंतच्या जागतिक घडामोडींचा मागोवा घेत पुढील २५ वर्षांतील अपेक्षित बदलांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येत असताना काय बदल घडतील, कोणती क्षेत्रे प्रभावित होतील व कोणत्या क्षेत्रांचा फायदा होईल याचा या पुस्तिकेत आढावा घेण्यात आला आहे.

या भेटीत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी कोविंद यांना सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली व सूर्यदत्तचे बोधचिन्ह असलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी पुणेरी पगडी भेट दिली व सुषमा चोरडिया यांनी कोविंद यांना राखी बांधून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच सूर्यदत्त वुमन एम्पाॅवरमेंट अँड लीडरशिप अकॅडमीच्या सूर्यदत्त सोशल अँड वुमन एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्हचे पुस्तकही भेट दिले.

बातम्या आणखी आहेत...