आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:खिडकीचे गज उचकटून येरवडा कारागृहातील पाच आरोपी फरार, तिघांवर मकोकासह गंभीर गुन्हे दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आसपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू, जवळील पोलिस स्टेशनला कैद्यांचे फोटो पाठवले

येरवडा कारागृहातून बुधवारी रात्री पाच आरोपी फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींनी कारागृहाच्या इमारत क्रमांक 4 च्या पहिला मजल्यावरील खोली क्रमांक 5 मधील खिडकीचे गज उचकटून पळ काढला. बुधवारी रात्री सहपोलिस निरीक्षक सुयश जोशी, पोलिस उपनिरीक्षक नितिन शिंदे हा कारागृहात रात्रपाळी कर्तव्यावर हजर होते. गुरुवारी सकाळी ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. 

देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अजिंक्य उत्तम कांबळे, सनी टायरन पिंटो अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी तीन कैद्यांवर मकोकासह गंभीर गुन्हे दाखल होते. कैदी पळून गेल्यानंतर या भागात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जवळच्या सर्व पोलिस ठाण्यांकडे त्यांचे फोटो पाठविण्यात आले आहे.