आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात 5 राष्ट्रीय रोजगार सेवा योजना केंद्र सुरू करणार:सीआयआय आणि डिक्कीचा उपक्रम, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळेंची माहिती

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली, भोपाळ या प्रमुख शहरात राष्ट्रीय रोजगार सेवा योजना केंद्र सुरू करून देशभरातील दहा हजार दलीत तरुणांना येत्या वर्षभरात उद्योग क्षेत्रात नोकऱ्या देणार असल्याचा निर्धार दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक व आय आय एम जम्मू चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला.

दलित तरुणांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचे कार्य करनाऱ्या दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डीक्की) या संस्थेने रविवारी हैद्राबाद येथे राष्ट्रीय रोजगार सेवा योजना केंद्र सुरू केले आहे. लवकरच देशातील पुणे, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद येथे या उपक्रमाची सुरुवात होणार आहे .पुण्यात सुरू झालेल्या या संस्थेने आता देशभरात व जगभरात डीक्की च्या कार्याचे जाळे पसरविले आहे . त्याचाच एक भाग म्हणजे आज हैद्राबाद येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी सी.शेखर रेड्डी उपाध्यक्ष सीआयआय तेलंगणा, सौगता रॉय चौधरी कार्यकारी संचालक काँनफेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ,आर .के.नारा राष्ट्रीय अध्यक्ष डिक्की, सीमा कांबळे महिला अध्यक्षा डीक्की, संजीव डांगी राष्ट्रीय सचिव डीक्की व देशभरातील दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे पदाधिकारी, सीआयआयचे प्रमुख आणि हैद्राबादमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच राष्ट्रीय मॉडेल करिअर सेंटर

यावेळी कांबळे म्हणाले की, देशभरातील दलीत तरुणांना उद्योजक आणि रोजगार निर्माण करण्यासाठी सीआयआय आणि डीक्की देशभरात आणखी पाच राष्ट्रीय मॉडेल करिअर सेंटर सुरू करणार आहे. एससी-एसटी समुदायातील तरुणांना मार्गदर्शन, कौशल्य आणि व्यवसाय प्रशिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने एमसीसी सुरू करण्यात आली आहे. देशात 42 मॉडेल करिअर सेंटर कार्यरत आहेत.

10 हजार तरुणांना समुपदेशन

या केंद्रातून तरुणांना नोकरी साठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन व नोकरी मिळवून देण्याचे काम होणार आहे. सीआयआय आणि डीक्की भागीदारीने चांगले काम केले आहे आणि समुदायातील 10 हजार हून अधिक तरुणांना समुपदेशन, कौशल्य, सह रोजगार मोठ्या प्रमाणात मिळण्याची आशा आहे.

नवीन कौशल्ये शिकण्याकडे लक्ष

सी.सी.शेखर रेड्डी म्हणाले, तरुणांनी नोकरी मिळवण्यासाठी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. व्यवसायाचे स्वरूप बदलत आहे आणि पदवी ते कौशल्यांमध्ये मोठे बदल होत आहेत. त्यांनी युवकांना केवळ औपचारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित न करता नवीन कौशल्ये शिकण्याकडे लक्ष द्यावे.

बातम्या आणखी आहेत...