आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:48 तासांपासून घरात अडकलेल्या 2 महिन्यांच्या चिमुकलीसह तिघांची एनडीआरएफच्या पथकाकडून सुटका

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली

पुण्यात मागील 48 तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामतीकडील नीरा आणि कह्रा नद्यांच्या सीमावर्ती भागात असलेली गावे पाण्याखाली आली आहेत. एनडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य सुरूच आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 3 हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

48 तासांपूर्वी मुख्य शहरांशी तुटला या गावाचा संपर्क

नीरा आणि कह्रा नदीचे संगम असलेल्या सोनगावमध्ये मागील 48 तासांपासून पुरात अडकलेल्या सोनवळकर कुटुंबातील तीन सदस्यांचे एनडीआरएफच्या टीमकडून शुक्रवारी सकाळी रेस्क्यू करण्यात आले. यात दोन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. शुक्रवारी सकाळी एनडीआरएफ टीमला माहिती मिळाली की, सोनगावमध्ये पुरामुळे 48 तासांपासून गावाचा संपर्क तुटला आहे.

याची माहिती मिळतचा एनडीआरएफचे पथक या ठिकाणी पोहचले आणि तिघांची सुटका केली. एनडीआरएफच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की, हे कुटुंब मागील 48 तासापासून उपाशी होते. अजून उशीर झाला असता तर दोन महिन्यांच्या चिमुकलीची प्रकृती बिघडली असती. या गावातून 26 जणांची सुटका करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...