आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:मेट्रोच्या कामासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडायला सुरुवात, तीन टप्प्यात पाडला जाणार उड्डाणपूल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पूल मंगळवारपासून पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एकावेळी न पाडता तीन टप्प्यात हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे.  पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तीस दिवसांमध्ये हे पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात हा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने वाहतुकीची जास्त अडचण होणार नाही. 

दरम्यान हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने करण्यास सुरूवात केली आहे. गणेशखिंड रस्त्यावरून ही मेट्रो जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरील पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. पुणे महापालिकेतर्फ अटी आणि शर्तींसह हा उड्डाणपूल पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवा पूल उभारताना महापालिकेकडून कोणताही खर्च देण्यात येणार नाही. 

राज्य सरकारकडून या कामास परवानगी देण्यात आली आहे. तर हे पूल महापालिकेच्या मालकीचे असल्याने ते पाडण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडूनही पीएमआरडीएला "एनओसी' देण्यात आली होती. यासोबतच एकाचवेळी पूल न पाडता तीन टप्प्यांमध्ये पाडण्यात येणार आहे.