आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्टिअरिंग कुणाच्या हाती:पंढरपूरपाठोपाठ मुख्यमंत्री स्वत: कार चालवत गेले पुण्याला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पारनेरप्रकरणी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना चेकमेट​​​​​ केल्याचे मानले जाते ​​

आमचे सरकार तीनचाकी रिक्षा आहे, मागे दोघे बसलेत आणि स्टिअरिंग माझ्या हाती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटले होते. यावरून सरकार शिवसेनाच चालवत असल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्वतःच्या हाती स्टिअरिंग असलेला, शेजारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले आहेत असा बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील एक जुना फोटो ट्विट केला.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार रोज मंत्रालयात येतात. राष्ट्रवादीच्या आमदारांची प्राधान्याने कामे करतात. प्राधान्याने निर्णय घेतात. पवार यांच्या या सर्व कारभारामुळे राज्य शासन उपमुख्यमंत्री अजित पवार चालवत असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा आहे.

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना चेकमेट​​​​​​​?

अहमदनगरच्या पारनेर शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले होते. उद्धव यांनी हे प्रकरण लावून धरले आणि राष्ट्रवादीला परत सेनेत त्यांची पाठवणी करावी लागली. एक प्रकारे उद्धव यांनी अजित पवार यांना पारनेरप्रकरणी चेकमेट केल्याचे मानले जाते.