आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण 

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता यांच्यापाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहोळ कुटुंबातील आठ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले होते. आता यानंतर त्यांच्या कुटुंबाची टेस्ट करण्यात आली. आता त्यांच्या कुटुंबातील आठ जणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी शनिवारी ट्विटरवरुन दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...