आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुरी:लग्नात रबडी खाल्ली; 100 वऱ्हाडींना विषबाधा, दोन जणांची प्रकृती गंभीर, राहुरी तालुक्यात टाकळीमियातील घटना

राहुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळीमिया येथील एका लग्न समारंभात रबडी खाल्ल्याने शंभरावर नागरिकांना रविवारी विषबाधा झाली. सुमारे ३६ जणांना विवेकानंद नर्सिंग होममध्ये, तर २५ जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयात काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

दत्तात्रेय यशवंत काळे व कोल्हार येथील कडस्कर कुटुंबातील लग्न समारंभ टाकळीमियातील वस्तीवर साजरा झाला. सकाळी ११ पासून जेवणावळींना प्रारंभ झाला. तासाभराने काहींना पोट दुखणे, उलट्या आणि जुलाब होणे, चक्कर येणे अशा तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे ही विषबाधा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर रुग्णांना तातडीने विवेकानंद नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास कड यांनी ही अन्नातून विषबाधा असल्याचे सांगितले. वऱ्हाडींना कोल्हार, सोनई, श्रीरामपूर येथील शासकीय तसेच ४ खासगी रुग्णवाहिकांतून बाधितांना हलवण्यात आले.

भेसळयुक्त दूध ?
जेवणात दुधापासून बनवलेली रबडी होती. रबडीसाठी भेसळयुक्त दुधाचा वापर झाल्याने विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दिशेने तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...