आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचे आईवर कोयत्याने वार:फिरायला पैसे न दिल्याने क्रूरकर्म्याने केला हल्ला; पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकणात फिरायला जाण्यासाठी पैसे न दिल्याने एका मुलाने चक्क आईवर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी येथील नवरत्न सोसायटी परिसरात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम मुलास बेड्या ठोकल्या आहेत. ईश्वर प्रकाश गलांडे (वय ३८, रा. नवरत्न सोसायटी, सर्वे नं ३, प्रकाश निवास वडगाव शेरी) असे या मुलाचे नाव आहे.

लाथा-बुक्क्यांनी मारहाण

या प्रकरणी ईश्वरची आई नंदा प्रकाश गलांडे यांनी येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरला कोकणात फिरायला जायचे होते. त्यासाठी त्याने आई नंदा यांना पैसे मागितले. परंतु नंदा यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा ईश्वर याला राग आला. त्याने रागाच्या भरात आई नंदा यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांना लाथा बुक्कांनी मारहाण केली.

हल्ल्यानंतर फरार

नंदा यांनी ईश्वरच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने घरातील कोयत्याने आईच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. यानंतर ईश्वर फरार झाला. नंदा या घटनेत गंभीर जखमी झाल्या. नातेवाईकांनी त्यांना दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर त्यांनी येरवडा पोलिस ठाणे गाठत मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी याची दखल घेत आरोपी मुलगा ईश्वर याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...