आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरची मैत्री पडली महागात:विद्यार्थ्याला सेक्ससाठी बोलावले अन् 55 हजारांना लुटले; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून टोळक्याने एमबीएच्या विद्यार्थ्याला मुलीसोबत सेक्स करण्याच्या आमिषाने बोलवून घेत त्याच्याकडून 55 हजारांची ऑनलाईनरित्या लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांजणांना खडक पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी पुण्यात घडली आहे. साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदामा चौधरी आणि रोहित चव्हाण (सर्व रा.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार तरुण मूळचा सांगली जिल्ह्यातील असून पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयात एमबीएच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेतो. त्याची फेसबुकवर साहिल कुरेशी याच्यासोबत मैत्री झाली होती. ओळखीतून त्यांनी एकमेकांना मोबाइल क्रमांक दिले होते. त्यानुसार आरोपीने तरुणाला संपर्क करुन सेक्ससाठी मुलगी हवी आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर साहिलने त्याला घरी बोलावून घेतले. रात्री नऊच्या सुमारास आरोपीचे तीन साथीदारही त्याठिकाणी आले होते. गप्पा मारल्यानंतर साहिल मूळचा शहरातील नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्याला दमदाटी करून पैशांची मागणी केली.

व्हिडीओ काढून त्याला गे असल्याचे भासवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरल्याने तरुणाने मोबाईलवरून ऑनलाईन 55 हजार 679 रुपये आरोपींच्या बँक खात्यात वर्ग केले. आरोपींनी त्याला रात्रभर डांबून ठेवून दुसऱ्या दिवशी सोडून दिले. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...