आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेयसी सोबतचा शरीर संबंधाचा व्हिडिओ मित्राला काढायला सांगितला. आता तो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने त्याच्या दोन मित्रांसोबत तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. या प्रकरणाची तक्रार तिने त्यांच्या घरच्यांकडे केली. तेव्हा त्यांनीही तिला मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार पुण्यात कोंढव्यातील अश्रफनगर येथे उघडकीस आला. या प्रकरणी रेहान सय्यद, शाहरूख शेख, सोहेल पठाण तसेच रेहान याची आई आणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय पीडितेने कोंडवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुलाच्या आईची मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेहान आणि पीडितेचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांमध्ये झालेल्या शरीरसंबंधाचा व्हिडिओ रेहानने त्याच्या मित्रांना काढायला सांगितला. यानंतर रेहान आणि त्याचे मित्र पीडितेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागले. एवढेच नाही तर त्यांच्याशी शरीर संबंध करायला भाग पाडले. ही बाब पीडितेने रेहानच्या आईला आणि बहिणीला सांगितली. मात्र, त्यांनी उलट मुलाची बाजू धरत पीडितेला मारहाण केली.
अजून अटक नाही
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, ते जसे सांगतील तसे कर असे तिला सांगितले. ही घटना ऑगस्ट 2021 ते आतापर्यंत घडली. दरम्यान, सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने कोंडवा पोसिल ठाणे गाठले. त्या ठिकाणी तिने तीच्यावर घडलेली आपबिती पोलिसांपुढे कथन केली. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. मचाले करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.