आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होणार:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक, नगर उपकेंद्रासाठी विकास अन् समन्वय समितीचे गठण

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेचे नव्याने गठन झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांची पहिली सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. सर्व सदस्यांबरोबर विद्यापीठातील संविधानिक अधिकारी तसेच प्रशासकीय विभागप्रमुख व शाखाप्रमुख यांचा परस्पर परिचय व संवाद आणि काही निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीनंतर व्यवस्थापन परिषदेच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक उपकेंद्र विकास व समन्वय समितीचे गठन करण्यात आले. तसेच अनुक्रमे डॉ. विखेपाटील राजेंद्र एकनाथराव व सागर अनिल वैद्य यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली. समितीमध्ये दोन्ही जिल्ह्यातील व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांचा समावेश असेल, असा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत विद्यापीठाचे पुढील शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट पासून सुरूवात करावयाचे असून त्याचे नियोजन करण्याकरीता प्राचार्य डॉ. वायदंडे देविदास भीमराव यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक वेळापत्रक निश्चित करून त्याचे नियोजन करणेसाठी समिती गठीत करण्यात आली. अधिसभेमध्ये यापूर्वी गठीत करण्यात आलेल्या डॉ. विखेपाटील राजेंद्र एकनाथराव समिती समवेत सहयोगाने विद्यापीठाच्या परिक्षा विषयक कामकाजाचा वेळेत निपटारा होण्याच्या दृष्टीने समितीने नियोजन करण्याबाबत समितीला सूचना करण्यात आल्या.

महाविद्यालयीन स्तरावर विविध कारणांनी भेटी देणाऱ्या विद्यापीठाच्या तज्ञ समितीमध्ये पात्र असणाऱ्या सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्याकरीता धोरण राबविण्यासाठी प्राचार्य डॉ. घोरपडे नितीन लक्ष्मण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सव आयोजन करण्याकरीता डॉ. विखेपाटील राजेंद्र एकनाथराव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. जी 20 परिषदेच्या अनुशंगाने विद्यापीठात कार्यक्रम आयोजन करण्याकरीता रवींद्र शिंगणापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.