आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील येवलेवाडी येथील एका जमिनीचा व्यवहार आपल्यासोबतच करावा आणि संबंधित जमीन नावावर करावी याकरिता धमकी देवून मारहाण करत कारची ताेडफाेड केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह चार जणांवर स्वारगेट पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सादीक सलीम खाेजा (वय ३९,रा.बाेट कल्ब राेड, पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दिली आहे.
आधी दिली धमकी
पाेलिसांनी याप्रकरणी विष्णू अप्पा हरिहर, राहुल दत्तात्र्य खुडे, (३८, रा. गुलटेकडी, पुणे), प्रेम श्याम क्षीरसागर (१८, रा. पर्वती दर्शन, पुणे) व त्याच्या इतर साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे. संबंधित प्रकार २७ मे आणि ६ जून रोजी घडला. तक्रारदार सादीक खाेजा यांचा जमीन खरेदी -विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची वडिलाेपार्जित जमीन काेंढवा परिसरात येवलेवाडी येथे आहे. त्याठिकाणी व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा हेतू हाेता. मात्र, लाॅकडाऊनमुळे आर्थिक मंदी असल्याने ते संबंधित प्रकल्प सुरू करू शकले नाही. या दरम्यान २०२१ मध्ये विष्णू हरिहर व राहुल खुडे त्यांच्याकडे आले. त्यांनी ही जमीन आपल्याला पाहिजे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी याेग्य भाव दिल्यास व्यवहार करू असे सांगितले. परंतु त्यानंतर सदर जागा हरिहर यांनाच विक्री करण्यात यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. २७ मे राेजी रात्री साडेनऊ वाजता तक्रारदार हे त्यांचे मित्र नसीर अन्सारी साेबत सॅलिसबरी पार्क येथील गाेल्डन बेकरीजवळ हाेते. त्यावेळी त्याठिकाणी विष्णू हरिहर व इतर साथीदार त्याठिकाणी लाठया, काठया, काेयते घेऊन आले. त्यांनी नसीर अन्सारी यांना दमदाटी करून त्यांच्या कारची ताेडफाेड केली. मात्र, एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याने मध्यस्थी केल्याने सदर प्रकरण मिटले.
तर गोळ्या घालेन
अन्सारी यांना पुन्हा १ जून राेजी त्यांना राहुल खुडेचा फाेन आला. त्याने त्यांना धमकावत येवलेवाडीचा जमीन व्यवहार विष्णू हरिहर यांच्यासाेबत कर नाही तर तुला गाेळया घालून ठार मारेन, अशी धमकी दिली. मात्र, तक्रारदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ६ जून राेजी ते कामानिमित्त गाेल्ड बेकरी येथे आले. त्यावेळी माेटरसायकलवर राहुल खुडे आला. त्याने त्यांना पाहून त्यांच्या दिशेने रिव्हॉलवरसारखे काहीतरी काढून रोखले. हे पाहिल्याने अन्सारी तातडीने भयभीत हाेऊन कार वेगाने घेऊन घरी गेले. त्यानंतर त्यांनी याबाबत महर्षीनगर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.