आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण:दिल्ली भाजपचे माजी आयटी सेल प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नवीनकुमार जिंदाल यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय एकात्मतेला बाधा

या प्रकरणी झाकीर इलियास शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जिंदाल यांच्याविरोधात राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचविणे, धार्मिक भावना दुखावणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंदाल यांनी एक जून रोजी हे वादग्रस्त ट्वीट करत विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखावल्या, असे फिर्यादीत नमूद आहे. भाजपचे दिल्लीतील माध्यम प्रभारी असताना जिंदाल यांनी केलेल्या या ट्वीटनंतर देशातून, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे पक्षाच्या धोरणाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भाजपने जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल

शेख यांनी तक्रारीत सांगितले आहे की, जिंदाल यांनी 1 जून रोजी आक्षेपार्ह ट्वीट करत मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहे. मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात आम्ही अर्ज दाखल केला असून यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...