आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनुवाद आणि मनीवाद ही देशाला लागलेली कीड आहे. आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही केवळ दोन वेळेच्या जेवणाचे हक्कदार ही संघाची धारणा आहे. या धारणेने सगळा देश पोखरला आहे, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.
भाई वैद्य फौंडेशन आणि राष्ट्रीय आरोग्य सेना यांच्यातर्फे दिवंगत समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२३’ कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार यांना मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष, आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्राह्मण्यवाद्यांनी यंत्रणा पोखरली
यावेळी बोलताना मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट आहे. संविधानाने दिलेल्या गोष्टीं विषयी बोलणे हा देखील आज गुन्हा ठरतो आहे. पण आम्हाला लेखणी दिली, तर आम्ही संविधान लिहू शकतो आणि आमच्या हातात तलवार दिली, तर आम्ही भिमा- कोरेगाव करू शकतो. मी राहूल गांधींबरोबर पदयात्रेत सामील झालो होतो. राहुल हे बुध्दाच्या मार्गाने जाणारा तरुण नेता आहे. पण ब्राह्मण्यवाद्यांनी सगळी यंत्रणा पोखरली आहे. त्यामुळे चांगला माणूस या देशात उभा राहणे अवघड आहे.
समाजवाद बदलला पाहिजे
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. जयासिंगराव पवार म्हणाले की, जागतिक पातळीच्या पटावर समाजवादाचा झेंडा घेऊन भाई वैद्य ठामपणे उभे राहिले. भाईच्या मतानुसार स्थानपरत्वे आणि कालपरत्वे समाजवाद बदलला पाहिजे. भाईंनी 'मनुस्मृती' आणि 'मार्केटस्मृती' या दोन्ही संकल्पनांनानांना विरोध केला. ही वित्तीय भांडवलशाही देशासाठी घातक असून त्याविरोधात लढा देण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.
गुणवत्तापूर्ण मोफत समान शिक्षण हा विचार भाईंनी मांडला. त्यांच्या नावाने मिळालेला आजचा हा पुरस्कार मी कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अर्पण करतो. कारण त्यांनी संधी दिल्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकलो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.