आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी आमदाराला अटक:ज्येष्ठ नागरिक दांपत्यास बेदम मारहाण; माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारचा दरवाजा अचानक उघडल्यावरून वाद, जाधव यांच्यासोबतची महिला पसार

एका ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जाधव यांनी आपल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवर जाणारे ज्येष्ठ नागरिक दांपत्य रस्त्यावर पडले. या वेळी ज्येष्ठ नागरिकाने जाब विचारला असता जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने मारहाण केली.

ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा अमन चढ्ढा (२८, रा.बोपोडी, पुणे ) यांनी याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अजय चढ्ढा आणि त्यांची पत्नी औंध येथून ब्रेमन चाैकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून संघवीनगरकडे जात हाेते. त्या वेळी माजी अामदार जाधव हे त्याच रस्त्याने जात असताना त्यांनी अचानक आपल्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दरवाजाचा धक्का लागून चढ्ढा दांपत्य दुचाकीवरून खाली रस्त्यावर पडले. याबाबत चड्डा दांपत्याने हर्षवर्धन जाधव (४३, बालेवाडी) यांना जाब विचारला असता जाधव यांना राग आला. या वेळी जाधव आणि कारमध्ये त्यांच्योसोबत असलेली महिला ईशा बालाकांत झा (३७, रा.वाकड, पुणे) या दोघांनी चढ्ढा व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करीत छातीत,पोटात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, आपले वडील यांना हदयविकाराची व्याधी असून जाधव आणि ईशा झा यांनी मारहाण करीत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली त्यावरुन चतु:शृंृंगी पोलिसांनी दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली. त्यांची महिला साथीदार मात्र घटनास्थळावरुन पसार झाली. पोलिस तिचा शोध घेत आहेत,अशी माहिती चतु:शृंृंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser