आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:मद्यपींना जाब विचारल्यामुळे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की, दोघांना अटक तर दोघे फरार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोथरुडमधील सहजानंद सोसायटीजवळील प्रकार
Advertisement
Advertisement

पुण्यातील कोथरुड भागात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यास बसलेल्या युवकांना जाब विचारला म्हणून कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली आहे.  या मारहाणीत त्यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघेजण फरार असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना शनिवारी संध्याकाळी घडली. याबाबत पोलिसांनी 4 पैकी 2 आरोपींना अटक केली आहे. अमर सयाजी बनसोडे आणि विनोद सुरेश गद्रे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, सहजानंद सोसायटीजवळ परिसरात चार तरुण हे मद्यपान करण्यासाठी बसले होते. त्यामुळे तिथे राहणाऱ्या राहुल कोल्हे यांनी त्यांना जाब विचारला. याचा राग आल्यामुळे दोघांनी राहुल यांना मारहाण केली. यावेळी राहुल यांची पत्नी मानसीदेखील तिथे होत्या. भांडणाचा आवाज ऐकू आल्यानंतर शेजारी राहायला असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी मेधा कुलकर्णींना मारहाण केली आणि पळ काढला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement
0