आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात दगडूशेठ हलवाईच्या चरणी:सहकुटुंब घेतले दर्शन; देशामध्ये समृद्ध वातावरण निर्माण होण्याची प्रार्थना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे बुधवारी दर्शन घेतले. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मी आलो होतो, कोरोनाच दोन वर्षाचे संकटामुळे आपण मागील दोन वर्ष गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही.

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने, चैत्यनाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे, या कालखंडामध्ये जीवनातल्या व्यथा असल्या, काळजी असली, दुःख असले हे सर्व विसरून गणपतीची आराधना करतात लोक, श्रींची आराधना करतात आणि पुढच्या सौख्य करता प्रार्थना करतात. सर्व समाजाच्या देशाच्या सौख्यकरता प्रार्थना करण्याची कालखंड आहे, असे म्हणाल तरी वावगे ठरत नाही. 40 वर्षापेक्षा जास्त काळ सहकुटुंब मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला येत असतो, प्रार्थना करतो, आशिर्वाद घेतो आणि माझ्या जीवनात माझ्या कुटुंबाच्या जीवनात हे आशिर्वाद खूप उपयोगी येतात अस माझे पक्क मत आहे.

देशामध्ये समृद्ध वातावरण

पुढे ते तू की, बाप्पाकडे मागणी हीच आहे की, सध्या समाजामध्ये जी दुही होतेय भेद निर्माण होत आहेत यामधून देशांमध्ये अस्थिरतेच वातावरण, दूषित वातावरण निर्माण होतात आपल्याला दिसत आहे ते दूर करावं, संपूर्ण समाज ही देशाची विविधता एक व्हावी आणि ती देशाची ताकद बनावी ही प्रार्थना केलीच आहे त्यासोबत वाढती ही सुद्धा काळजीचा विषय आहे, बेरोजगारीचा विषय आहे कुठंतरी हे सगळे दुःख आहे ते दूर व्हावेत आणि एक समृद्ध वातावरण देशामध्ये निर्माण व्हावे याकरिता मी प्रार्थना केली आहे.

भाविक झाले प्रसन्न्

बनारस काशी येथून आलेल्या महाआरती समितीच्या हिमांशू पांडे आणि इतर सदस्यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस महाआरती केली. यावेळी त्यांनी शंख ध्वनी करून भगवान गणेशाची स्तुती शंखाने केली. गणपतीला धूप धाकवून, झाल आरती, नाग आरती, मोर पंख आरती आणि चमर आरती करण्यात आली. गणपती मंत्र पुष्पांजली नंतर महाआरती संपन्न झाली. यावेळी ही आरती बघण्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंत्रमुग्ध वातावरणात भाविक प्रसन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...