आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्का:माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांचा राजीनामा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसने केलेल्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे दिले आहेत असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर असलेल्यानी पदे रिक्त करण्याचा राष्ट्रीय काँग्रेसने केलेल्या ठरावानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणूक पाहता आता पुणे शहराला नवा शहराध्यक्ष लवकरच निवडावा लागणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी राजस्थान मध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबिरात 'एक व्यक्ती एक पद' असा ठराव करण्यात आला होता.या ठरावानुसार शिर्डीत झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या अधिवेशनात 51 जणांनी तात्काळ राजीनामे दिले. त्यात रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांचाही समावेश आहे. मागील पाच वर्षांहून अधिक काळापासून छाजेड आणि टिळक पक्षाचे काम करीत आहे तर बागवे यांनाही शहराध्यक्षपदी निवड होऊन सहा वर्षे झाली आहेत. त्यामुळे या सर्वांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करीत आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश कॉंग्रेसकडे सादर केले असल्याचे सांगण्यात आले आहे.बागवे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता शहराध्यक्षपदावरून पुन्हा एकदा शहर कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.

पुणे काँग्रेस पक्षांतर्गत संघर्षही अनेकदा समोर आला आहे. मात्र बागवे हे पद टिकविण्यात यशस्वी झाले. पण आता बागवे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे पुन्हा एकदा या पदासाठी पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेसची पुण्यातील स्थिती सध्या बिकट असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आणि पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी नवीन शहर अध्यक्ष यांना कसरत करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...