आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील फुरसुंगी उरळी देवाची स्वतंत्र नगर परिषद लवकरच होणार असल्याने या भागातील विकासाला चालना मिळेल. पुरंदरमधील 39 गावांचा समावेश नवीन नगर परिषदेत केला असला, तरी या भागात नवीन विमानतळ होणार असल्याने पीएमआरडीए अंतर्गत संपूर्ण पुरंदरचा समावेश यामध्ये 'ग्रीन बेल्ट' म्हणून करावा अशी मागणी राज्य सरकारकडे करणारा असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे.
फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्याची अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे.याबाबत नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदेची भविष्यातील वाटचाल ,नागरिकांच्या अपेक्षा आणि शासनाची दिशा या विषयाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले शिवतारे?
शिवतारे म्हणाले, नवीन नगरपरिषद ही सदर भागातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात वारंवार विविध पक्षांकडे मागणी केली होती. मात्र, त्याची पूर्तता झाली नव्हती. राज्यातील युतीच्या सरकारने त्याची पूर्तता केली आहे. लवकरच याठिकाणी प्रशासक नेमणूक होऊन नियोजन विकास आराखडा तयार होईल.हा भाग आधी पुणे मनपाच्या हद्दीत समाविष्ट झाल्यामुळे नागरिकांची पायाभूत सुविधांची ही वनवा निर्माण झाली होती.
ग्रामपंचायतच्या स्तरावर ज्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या होत्या, त्या मनपा हद्दीत गेल्यावर मिळेनासे झाले होत्या. शहराचा विकास, पाणी ,रस्ते, वीज ,बस आदी बाबत आता लवकर निर्णय होऊ शकेल.
मनपा हिशोब देत नाही
पुण्याची कचरा डेपो सदर भागात बाजूला ठेवण्यात आलेली आहे. सदर जागा आधिसूचनेत बाजूला ठेवण्यात आली असून मागील २५ वर्षे पुण्याचा कचरा या ठिकाणी टाकला गेल्याने अनेक समस्या नागरिकांना निर्माण झाल्या आहे. पुणे मनपाने याभागात 225 कोटी रुपये खर्च केले असे सांगितले आहे. मात्र ,त्याबाबतचा हिशोब ते देत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.