आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत, शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील कार्यक्रमात केला प्रवेश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुबोध मोहिते हे पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावून रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घातले आहे.

सुबोध मोहिते यांचा हा पाचवा पक्ष आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुबोध मोहिते हे वाजपेयींच्या काळात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते. त्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेनेमध्ये बाहेर पडले होते.

सुबोध मोहिते हे पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावून रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यानंतर शिवसेनेमध्ये काही मतभेदांनंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते यानंतर रामटेकमध्ये लोकसभा निवडणूक लढले. मात्र ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी विधानसभेमधूनही निवडणूक लढवली. मात्र यावेळीही ते निवडून येऊ शकले नाहीत. यानंतर ते बराच काळ राजकारणातून अलिप्त होते. आता त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग निवडला आहे.

बातम्या आणखी आहेत...