आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निधन:माजी केंद्रीय सचिव पद्मभूषण डाॅ. पी. आर. दुभाषी यांचे निधन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष, माजी केंद्रीय सचिव पद्मभूषण डॉक्टर पद्माकर रामचंद्र दुभाषी यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, विवाहीत मुलगा, कन्या, सून, नातवंडे असा परिवार आहे.

डॉक्टर दुभाषी यांनी राज्य व केंद्र शासनात 40 वर्षे विविध पदांवर काम केले. गोवा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.