आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिंग झिंग झिंगाट:पुण्यात बोलेरोत मिळाली 770 लिटर हातभट्टीची दारू; हडपसर पोलिसांची कारवाई, चालकाला बेड्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हडपसर पोलिस स्टेशनच्या मार्शलने संशयावरून फुरसुंगीतील सोनार पुलाजवळ एका बोलेरो पिक-अपची तपासणी केली. यावेळी गाडीत 35 लिटरच्या 22 कॅनमध्ये एकूण 770 लिटर हातभट्टीची दारू आढळून आल्याची घटना रविवारी घडली.

पोलिसांनी याप्रकरणी बोलेरो पिकअप चालकाला अटक करून त्याच्या ताब्यातून साडेसात लाख रुपयांची गाडी, 55 हजार रुपये किमतीची दारू आणि साडेचार हजार रुपये, असा एकूण लाख 9 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनेश साधू सहानी (वय ३८, रा. शितळादेवी चौक, आकुर्डी, पुणे) असे अटक केलेल्याचे टेम्पोचालकाचे नाव आहे. त्याला पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी मार्शल अतुल पंधरकर यांनी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे मार्शल तुकाराम गुरव, गणेश भिसे, अतुल पंधरकर, अंमलदार बजरंग धायगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...