आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदु राष्ट्र सेनेच्या हंबीरवरील हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक:मित्राच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हंबीरवर हल्ला

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर ससून रुग्णालया झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सागर ओव्हाळ, बालाजी ओव्हाळ ,सुरज शेख, सागर आटोळे या चौघांना गार्डन पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी मात्र फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

खुनाचा बदला घेण्यासाठी हल्ला
अटक केलेल्या आरोपींचा मयत असलेला मित्र सुजित वर्मा याच्या खूनाचा बदला म्हणून आरोपींनी हिंदुराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेले सर्व आरोपी हडपसर परिसरात राहणारे आहेत. हिंदुराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षवरील हल्यानंतर शहरासह राज्यात खळबळ उडाली होती.

हिंदू राष्ट्रसेनेच्या तुषार हंबीर याच्यावर रात्री उशीरा पाच जणांच्या टोळक्याने बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी धारदार हत्त्यारांनी हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. त्याच्यावर हल्ला करणार्‍यांचा शोध घेण्यासाठी आता बंडगार्डन पोलिसांची दोन पथके, हडपसर पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेची विविध पथके रवाना केले होते.

याबाबत तुषार नामदेवराव हंबीर (35, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात कट रचणे खुनाचा प्रयत्न, आर्मअ‍ॅक्ट, तसे सरकारी कामात अडथळल्या आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड तुषार हंबीर हा हिंदू राष्ट्र सेनेचे काम करत असून तो लोणी काळभोर पोलिस ठाण्यात 2016 मध्ये दाखल झालेल्या मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्याला हाडांचा व स्नायू दुखण्याचा त्रास होत असून त्याला चालण्यासाठी त्रास होतो. त्या निमित्ताने त्याला वारंवार रूग्णालयात उपचारा कामी ससून रूग्णालयात न्यूरो-ऑर्थो डॉक्टरकडे यावे लागते. त्याला चालण्याचा त्रास होत असल्याने दि. 25 ऑगस्ट रोजी तो ससून रूग्णालयात उपचारासाठी आला असताना त्याला डॉक्टरांनी रूग्णालयातील इन्फोसीस बिल्डींगमधील तिसर्‍या मजल्यावर दाखल केले होते.

त्याच्यावर उपचार सुरू असताना पाच जणांचे टोळके रूग्णालयात हत्यारासह शिरले. या ठिकाणी मुख्यातील पोलिस कर्मचारी गस्तीसाठी नेमलेले होते. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास टोळक्यातील एकाने पिस्तुल बाहेर काढले. परंतु पिस्तुलातून गोळी झाडून हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुलातून गोळीच फायर झत्तली नाही. याच वेळी तलवार, कोयत्याने वार करत असताना तेथे असलेले गार्ड बागड व हंबीरच्या यांचा मेव्हणा मध्ये पडला. यावेळी त्यांच्या हातावर वार झाले. यावेळी एकाने तलावरीने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्या ठिकाणी गोंधळ उडाल्याने व पोलिस गार्डने रायफल काढल्याने पाचही जण घटनास्थळावरून पळून गेले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आणि तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर

ससून रूग्णालयाची सुरक्षा व्यवस्था असताना संशयीत आरोपी हत्यारे घेऊन आत गेलेच कसे ? त्यांना कोणी आडवले नाही का ? यावेळी सुरक्षा व्यवस्था काय करत होती हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याच बरोबर ससूनमधील सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृह पोलिस अधीक्षक राणी भोसले म्हणाल्या की, हंबीर हा एका गुन्ह्यात न्यायालयीन बंदी आहे. त्याला मनक्याचा तसेच स्नायूंचा त्रास असल्याने त्याला रूग्णालयात उपचारा कामी ससून रूग्णालयात न्यूरो-ऑर्थो डॉक्टरकडे पाठवावे लागते. त्याला चालण्याचा त्रास होत असल्याने दि. 25 ऑगस्ट रोजी तो ससून रूग्णालयात उपचारासाठी गेला असताना त्याला डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...