आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:उद्याेगपती अविनाश भाेसलेंशी संबंधित चार काेटींची मालमत्ता जप्त

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नामांकित उद्याेगपती अविनाश भाेसले सध्या सक्त अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असून भाेसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीशी संबंधित काॅर्पाेरेट ऑफिसची चार काेटी रुपयांची स्थिर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अविनाश भाेसले यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी पुणे पाेलिसांत तक्रार दाखल असून त्याबाबतचा तपास सध्या ईडी करत आहे. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील रेंज हिल येथील यशवंत घाडगेनगर काेऑपरेटिव्ह हाउसिंग साेसायटीत भाेसले यांचे आलिशान कॉर्पोरेट ऑफिस आहे. रणजित माेहिते यांनी संबंधित कार्यालयाची जागा एआरए प्राॅपर्टी यांच्याकडे बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केली.

संबंधित जमीन शासकीय असल्याने केवळ शासन व त्याच्याशी संबंधित संस्था यांना हस्तांतरित करण्याचा नियम १९५१ पासून असताना ती बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केली गेली. ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास करत असताना अविनाश भाेसले यांच्या कंपनीशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे गाेळा केले आहेत. छापेमारीत मिळालेल्या कागदपत्रांच्या विश्लेषणावरून भाेसले यांच्याविराेधात एफआयआर दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, अविनाश भोसले यांच्यावर कारवाई केल्याने अनेकांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...