आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली असल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. चिखली मार्गावरील एचडीएफसी एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडतांना एटीएम मशीनने पेट घेतल्याने दोन एसी, सीसीटीव्ही तसेच एटीएममधील 4 लाखांची रोकड भस्मसात झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अमोल दिगंबर शिंदे (वय ४२, रा गणेश पेठ,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. चिखली येथे एचडीएफसी बँकेचे एक एटीएम आहे. रविवारी रात्री काही चोरटे एटीएम फोडण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आले. चोरट्याने सुरवातीला एटीएमच्या काचेच्या दरवाजाच्या आतून प्रवेश करत आतील सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारला. यानंगर गॅसकटरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅसकटरच्या ठिणग्यामुळे संपूर्ण एटीएमने आग पकडली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. दरम्यान, या आगीमुळे चोरटे घाबरले आणि तेथून पळाले. दरम्यान, या आगीत एटीएम रुममधी दोन एसी, 2 सीसीटीव्ही आणि एटीएममधील तब्बल चार लाख रुपयांची रोकड ही भस्मसात झाली. तसेच फर्निचरचेही मोठे नुकसान झाले.
आग लागल्याचे कळताच काही स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत एटीएमसह सर्व रक्कम जळून खाक झाली होती. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक व्हीं म्हस्के, तसेच पोलिस उपनिरीक्षक एस कुमटकर हे पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.