आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आली. त्यानंतर पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.
घटना घडण्याच्या आधी सतत सहा वेळा गेली लाइट ही घटना घडण्याच्या आधी सतत सहा वेळा लाईट गेली होती. घटनेनंतर चौघांचे मृतदेह नदीत मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण राजगड पोलिस आरोग्य विभाग दाखल झाले होते आहे. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.