आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:साताऱ्यात चार शिवशाही बसने एकामागोमाग घेतला पेट, अग्नीशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

साताराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरामध्ये उभ्या असलेल्या चार शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्नीशमनदालाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या आगीमुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. या बसच्या बाजूला मोठी इमारत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे दुर्घटना टळली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस चौकशी करत आहेत. या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...