आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:चार वर्षीय चिमुकली त्रास देत असल्या कारणामुळे आईने केली निघृण हत्या; पिंपरी-चिंचवडमधील सांगवीतील घटना

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी आईला पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात चार वर्षीय चिमुकली त्रास देत असल्या कारणामुळे जन्मदात्या आईने खून केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली असून या प्रकरणी आईला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आधी मुलीला फरशीवर आपटले नंतर आवळला गळा

रिया दीपक काकडे वय- 4 वर्षे रा.भालेकर नगर असे मृत मुलीचे नाव असून सविता दीपक काकडे असे आरोपी आईचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलगी त्रास देत असल्याने आईने आधी फरशीवर जोरात आपटले आणि नंतर गळा आवळून खून केला. घरात सहा महिण्याचा मुलगा, आई आणि चार वर्षीय चिमुकली रिया होती. तेव्हा ही हृदयद्रावक घटना घडली आहे.