आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुळका लीड क्लाइंबिंग:चौदा वर्षीय युवराजने एकाच दिवशी सर केले तैलबैला, नागफणी सुळके

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेठ्या जिद्द आणि धाडसाने १४ वर्षीय युवराज जाधवने एकाच दिवशी सर्वात आव्हानात्मक मानले जाणारे सुळके सर करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने लाेणावळ्या जवळील ३३२२ फूट उंच तैलबैला आणि ३००० फूट उंचीचा नागफणी सुळका लीड क्लाइंबिंग करून यशस्वीपणे सर केले. याठिकाणी झेंडा फडकवून त्याने “बालमजुरी हटवूया, खंबीर भारत घडवूया” हा सामाजिक संदेशही दिला. याच सामाजिक कार्यासाठी त्याने ही माेहीम आखली हाेती. पुण्यातील एस. एल. एडवेंचर स्पोर्ट््सच्या मदतीने त्याने बालकामगारविरोधीदिनी त्याने ही माेहीम फत्ते केली. तैलबैला हा सुळका अधिक अवघड मानला जाताे. याची उंची (३३२२ फूट) तर जमिनीपासून (२५० फूट) आहे. तसेच नागफणी सुळका समुद्रसपाटीपासून (३००० फूट) तर जमिनीपासून (३०० फूट) उंच आहे. यादरम्यान त्याला राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल येथे अमोल जोगदंड यांचे खास मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...