आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफायनान्स कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळवुन देण्याचे आमिष दाखवत एका साॅफ्टवेअर अभियंत्याची तब्बल 47 लाख 80 हजार रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलिस ठाण्यात बुधवारी (ता. 22) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दिपक रमेश शिंदे (वय : 27,रा. बाणेर, पुणे) असे संशियिताचे नाव आहे. याबाबत गाैरव रामकुमार गाेयल (रा. पुणे) यांनी पाेलीसांकडे संशयिताविराेधात तक्रार दिली. या प्रकरणाक 10 डिसेंबर 2021 ते 20 एप्रिल 2022 यादरम्यान घडला. गाैरव गाेयल हे व त्यांची पत्नी असे दाेघे साॅफ्टवेअर अभियंता आहे. कल्याणीनगर परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत ते काम करत असून त्यांचे वार्षिक पॅकेज 49 लाख रुपये आहे. पूर्वी ते बाणेर परिसरात काम करत हाेते. त्यावेळी त्यांची अमाेल खरात नावाचे एका तरुणाशी ओळख झाली व ते दाेघे दहा वर्ष मित्र आहे.
खरात याचा मित्र दिपक शिंदे याची गाैरव गाेयल यांच्यासाेबत डिसेंबर २०२१ मध्ये ओळख झाली हाेती. त्याने ताे सीए फायनान्सर, शेअर मार्केट, स्वामी समर्थ पंडीत, हात पाहताे, लाेकांच्या घरी जाऊन पूजा करताे, युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करताे वगैरे माहिती सांगुन त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच माझी बहिण अहमदाबाद येथे कलेक्टर असल्याचेही सांगितले.
माझे पाेलिस आणि राजकारणात खूप मित्र आहे, असे सांगत त्यांचे मी हात पाहून भविष्य सांगताे असे सांगितले. त्यानंतर फायनान्सकडून अधिक व्याजाचे अमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगुन त्याने तक्रारदार यांचेकडून एकूण 47 लाख 80 हजार रुपये वेळाेवेळी घेतले. मात्र, संबंधीत पैसे परत न करता त्यांचा विश्वासघात करुन आर्थीक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत चतृश्रृंगी पाेलिस पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.