आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात फसवणूक:वखार महामंडळात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक; सात लाख रुपयांना लावला चुना

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत मामा-भाच्याला सात लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आराेपी लक्ष्मण शिवाजी आरे (रा. मार्केटयार्ड, पुणे) व विनायक पिरप्पा पुजारी (रा, पुणे) यांचे विराेधात स्वारगेट पाेलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मनीष चंद्रकांत काळभाेर (वय २५,रा. भुगाव, ता. मुळशी, पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दिली आहे. सदर प्रकार 25/6/2020 ते आतापर्यंत घडलेला आहे. तक्रारदार मनीष काळभाेर व त्यांचे मामा विवेक माेरे यांना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात लक्ष्मण आरे व विनायक पुजारी या दाेन आराेपींनी नाेकरी लावून देण्याचे अमिष दाखवले. त्याकरिता त्यांचे शैक्षणिक मुळ कागदपत्रे आराेपींनी घेतली. त्यानंतर मनिष काळभाेर याच्याकडून 2 लाख 45 हजार रुपये तर त्याचे मामा विवेक माेरे यांचेकडून 4 लाख 56 हजार रुपये असे एकूण सात लाख एक हजार रुपये आराेपींनी घेतले. मात्र, त्यांना काेणत्याही प्रकारची नाेकरी न लावता त्यांची मुळ कागदपत्रे न देता पैशाची मागणी केली असता सदर रकमेतील 96 हजार रुपये परत ट्रान्सफर करण्यात आले. मात्र, एकूण रकमेतील 6 लाख पाच हजार रुपये परत न करता मारण्याची धमकी देवून फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास स्वारगेट पाेलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...