आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मेट्रोच्या नावाने फसवणूक:आपल्या जागेवर प्रकल्प होणार असल्याची बतावणी करत घातला सव्वा कोटींचा गंडा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून नातेवाईकांसह परिचितांची सव्वा कोटींची फसवणूक करणाऱ्या विरोधात पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

पुण्यातील शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरात स्वत:च्या जागेवर मेट्राेचा प्रकल्प हाेणार असल्याचे खाेटे सांगितले. त्यांना गुंतवणुक केल्यास ऑफीसच्या किमतीत प्रचंड वाढ हाेईल व त्यामुळे फायदा हाेईल असे अमिष दाखवून एका व्यवसायिकाची आणि त्याच्या नातेवाईकांची तब्बल एक काेटी 21 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात आराेपी ईश्वर चंदुलाल परमार (वय-70) व सनत ईश्वर परमार (46) यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी साेमवारी दिली आहे.

याबाबत पंकज गुल जगासिया (वय-43,रा.पुणे) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. आराेपी ईश्वर परमार व सनत परमार यांनी प्लाॅट नं 806 कामगार पुतळा, भांबुर्डा, शिवाजीनगर पुणे येथील जागेवर मेट्राेचा प्रकल्प हाेणार असल्याचे माहिती हाेते. तरीसुध्दा सदर जागेवर त्यांना विकसनाचे काेणतेही अधिकार नसल्याची पूर्ण जाणीव असतानाही तसेच अधिकार त्यांना आहेत असे तक्रारदार पंकज जगासिया यांना सांगुन त्यांची फसवणुक करण्याचे उद्देशाने सदरचे जागेवर त्यांचा प्राेजेक्ट हाेणार असल्याचे खाेटे सांगितले. त्यात गुंतवणुक केल्यास जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून तसेच त्यांचे अ्राॅफीसचे किमतीत प्रचंड वाढ हाेईल व त्यामुळे तक्रारदार यांना फायदा हाेईल असे सांगण्यात आले. सदरचे प्रत्येक ऑफीसनंतर आराेपी यांचे कंपनी मे.ईश्वर कन्स्ट्रक्शन हे 51 लाख रुपयांना विकत घेईल असे प्रलाेभन दाखवले. तक्रारदार यांना आश्वासने व वचने देऊन सदरचे प्राेजेक्ट मध्ये व अन्य ओळखीच्या लाेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून सर्वांकडून मिळून एकूण एक काेटी 21 लाख 40 हजार रुपये चेकद्वारे व आरटीजीएस द्वारे मे.ईश्वर कन्स्ट्रशक्न प्रा.लि.चे काेटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर घेतले. परंतु ऑक्टाेबर 2016 पासून आतापर्यंत सदरचे ठिकाणी काेणतेही ऑफीस बांधलेले नसून घेतलेली रक्कम परत न करता ती स्वत:चे फायद्याकरिता आराेपींनी वापरुन रकमेचा अपहार करत फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...