आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीचे आमिष:पुण्यात व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक, रक्कम मागताच आरोपीकडून शिवीगाळ

पुणे | प्रतिनिधी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामांकित कंपनीस गुंतवणुकदार देतो असे सांगत व्यावसायिकाची दीड कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने सेवा शुल्काच्या नावाखाली व्यवसायिकाकडून एक कोटी ८२ लाख रुपये घेतले. मात्र, नंतर व्यावसायिकाला गुंतवणुकदार न देता काही रक्कम परत करुन सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी व्यवसायिकाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी महेंद्र खांदवे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात पोलीसांकडे राजेश ईश्वरलाल मेहता (वय ६१) यांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२१पासून सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अशी केली फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेश महेता हे ओरा इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहे. आरोपी महेंद्र खांदवे हे एमआयएमएस ग्लोबल लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. खांदवे यांनी ओरा इनोव्हेशन प्रा.लि. कंपनीत गुंतवणुकदार देतो, असे सांगून राजेश महेता यांच्याकडून सर्व्हिस चार्जेसकरिता एकूण एक कोटी ८२ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांनी कोणतेही गुंतवणुकदार न दिल्याने तक्रारदार यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने एक कोटी ८२ लाख रुपयांपैकी २९ लाख आठ हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम वारंवार मागूनही त्याची परतफेड न करता तसेच कोणताही गुंतवणुकदार न देता आर्थिक फसवणूक केली.

गुंतवणुकीच्या अमिषाने गंडा
दुसऱ्या एका घटनेत पीएसीएल कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनंतर दुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची २१ हजार ५०० रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी राजू रुपसिंग बावरे (वय ५०)यांनी आरोपी प्रमोद बाळु ढोरे याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर येरवडा पोलिसांनी आरोपीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी हे येरवडा परिसरात लक्ष्मीनगर भागात एकाच परिसरात रहाण्यास आहे. आरोपी प्रमोद ढोरे याने तो पीएसीएल कंपनीत काम करतो असे सांगुन तक्रारदार राजू बावरे यांना कंपनीत गुंतवणुक केल्यास पाच वर्षानंतर दुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी पाच वर्षांकरिता २१ हजार रुपयांची गुंतवणुक कली. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांच्या पत्नीने गुंतवलेले पैसे आरोपीकडे मागितले. त्यावेळी आरोपीने पैसे मिळणार नाही, असे सांगत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...