आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:‘क्रिप्टो’त गुंतवणुकीच्या आमिषाने दीड कोटीची फसवणूक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिट्स कॉइन आणि ब्लू पिक क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगल्या प्रकारे परतावा मिळेल, असे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर, जालना, पनवेल, भिवंडी येथील आठ जणांची तब्बल एक कोटी ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात येरवडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इम्रान खान (३५, रा. खराडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ. पराग श्रीरंग दिनकर (रा. मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार मे २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.