आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहडपसर परिसरात विकसनासाठी दिलेल्या एका जमिनीवर उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पात बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे न देता, पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची दोन कोटी 54 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी तीन बांधकाम व्यावसायिक, येस बँकेचे शाखा अधिकारी, येस बँकेचे एमडी,जनता सहकारी बँकेचे संचालक, मॅनेजर, यांच्यावर न्यायलयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
याप्रकरणी व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे भुषण पारलेशा , निलेश पारलेशा , विलास थंनमल पारलेशा , जनता सहकारी बँकेचे संचालक संजय मुकुंद लेले , मॅनेजर नरेश दत्तु मित्तल, येस बँकेच्या कल्याणीनगर व विमाननगर शाखेचे मॅनेजर, येस बँकेचे एमडी रणवीत गिल (रा. मुंबई) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आर आर तुपे बिल्डर्स प्रा. लि. चे राहुल रामदास तुपे (वय-52 रा. मांजरी बु. ता. हवेली ,पुणे) यांनी तक्रार दिली आहे. सदरचा प्रकार जुलै 2016 ते 1 एप्रिल 2023 या कालावधीत घडला आहे.
तक्रारदार राहुल तुपे यांचा आर आर तुपे बिल्डर्स प्रा. लि. या नावाने बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली हडपसर परिसरातील सर्वे नं. 201 ही जागा व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे भुषण पारलेशा, निलेश पारलेशा, विलास थंनमल पारलेशा यांना विकसनासाठी करारनामा करुन रीतसर दिली होती. ग्राहकांनी बुक केलेल्या फ्टॅटच्या रक्कमेपैकी 41.73 टक्के तक्रारदार यांना तर उर्वरित 58.27 टक्के व्हीटीपी अर्बन प्रोजेकला देण्याचे नियमाने ठरले होते.मात्र, आरोपी पारलेशा यांनी संगनमत करुन खोटी कागदपत्रे तयार केली. तसेच त्यावर तक्रारदार यांच्या खोट्या सह्या केल्या. कागदपत्रांवर तक्रारदार यांच्या खोट्या सह्या असल्याचे माहिती असताना देखील, जनता सहकारी बँकेचे संचालक संजय लेले व भवानी पेठ शाखेचे मॅनेजर नरेश मित्तल यांनी आरोपी पारलेशा यांना तक्रारदार यांच्या खात्याचे चेकबुक दिले.
त्याचप्रमाणे येस बँकेच्या कल्याणीनगर आणि विमाननगर शाखेच्या ब्रँच मॅनेजर यांनी देखील खोटी कागदपत्रे वापरून व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट या नावाने बानावट खाते काढले. ग्राहकांच्या फ्लॅट बुकींगच्या वेळी व फ्लॅट अग्रीमेंट करण्याच्या आगोदर तक्रारदार यांची परवानगी, संमती व ग्राहकांच्या बुकींग संमतीपत्रावर सही घेणे रीतसर बंधनकारक होते. परंतु आरोपींनी तक्रारदार यांच्या वाट्याची 2 कोटी 54 लाख रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.