आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे तिथे काय उणे:अपंगत्वाचा बनावट दाखला देत प्रशासनाची फसवणूक, ससूनमधील डेटा ऑपरेटरला अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ससून रूग्णालयात डेटा ऑपरेटर असलेल्या एकाने बनावट अपंगत्वाचा दाखला देऊन प्रशासनाची फसवणूक केली आहे. ही घटना 7 एप्रिलला घडली आहे. याप्रकरणी सचिन चंद्रकांत बाजारे (रा. पुणे) विरूद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ससूनमधील प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रार दिली होती.

अपंगत्व असलेल्यला डिसॉब्लिटी (शरीरात अंपगत्व किती आहे याचा दाखला) याचे प्रमाणपत्र शासकीय रूग्णालयातून घ्यावे लागते. त्यासाठी चाचणी घेतल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाते. ससून रुग्णालयातील एच.एम.आय.एस. प्रोजेक्ट टेडा एन्ट्री ऑपरेटरकडे हे काम असते.

त्यांच्याकडील कर्मचारी सचिन बाजारे ऑपरेटर यांनी सिंह यांना बनावट अपंगत्व प्रमाणपत्र देऊन ससून रुग्णालयाची फसवणूक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ससूनमधील प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...