आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पुण्यामध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची दीड काेटीची फसवणूक

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामांकित कंपनीस गुंतवणूकदार देताे, असे सांगत सर्व्हिस चार्जेसकरिता व्यावसायिकाकडून १ काेटी ८२ लाख रुपये घेऊन त्यास गुंतवणूकदार न देता काही रक्कम परत करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिक राजेश ईश्वरलाल मेहता (६१, रा.बाणेर, पुणे) यांनी चतु:शृंगी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आराेपी महेंद्र खांदवे (रा.सेनापती बापट राेड, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते आजपर्यंत घडलेला आहे. तक्रारदार राजेश मेहता हे आॅरा इनाेव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक असून आराेपी महेंद्र खांदवे हे एमआयएमएस ग्लाेबल लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. खांदवे यांनी आॅरा इनाेव्हेशन प्रा.लि. कंपनीत गुंतवणूकदार देताे, असे मेहता यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...