आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संचालकास शैक्षणिक कामकाजाकरिता 75 काेटी रुपयांचे कर्ज मिळवून देताे असे एका दाम्पत्याने सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, संबंधित रकमेचे कर्ज मिळवून न देता त्यांची कर्जाच्या प्रासेसिंग फी च्या नावाखाली 12 लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल
याप्रकरणी राजेश शेळके व मानसी शेळके (रा.कल्याण,मुंबई) या आराेपींवर सिंहगड राेड पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा गुरुवार 9 जून रोजी दाखल करण्यात आला. याबाबत काॅलेजचे प्रमुख डाॅ.सुधाकर उध्दवराव जाधवर यांनी तक्रार दिली आहे.
12 लाखाची केली फसवणूक
हा सगळा प्रकार जून 2019 ते जून 2022 मध्ये घडला. राजेश शेळके व मानसी शेळके हे प्राेग्रेस एंटरप्रायझेसचे मालक आहे. त्यांनी डाॅ.सुधाकर जाधवर यांचे प्रेरणा प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या सुधारणेसाठी 50 काेटी रुपये व उध्दवराव जाधवर फांऊडेशनला 25 काेटी रुपये असे एकूण 45 काेटी रुपये कर्ज मिळवून देताे असे सांगितले.
कर्ज मिळवून देत असल्याचे सांगत त्यांनी जाधवर यांना विश्वासात घेतले, लबाडीच्या इराद्याने कर्जाच्या प्राेसेसिंग फी च्या नावाखाली आरटीजीएसने प्राेग्रेस एंटरप्रायझेसच्या व मानसी शेळके यांच्या बँक खात्यावर 12 लाख रुपये पाठवले. मात्र यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज न देता तसेच कर्ज मंजूर झाल्याची कागदपत्रे पाठवून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सिंहगड राेड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.