आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गुन्हा दाखल:कॅन्सर औषधासाठी हर्बल सीडस पाठवण्याचे बहाण्याने 17 लाखांची फसवणूक

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशातील एक कंपनी कॅन्सरसाठी औषध बनवत असून त्यासाठीचे हर्बल सीडस भारतात स्वस्तात मिळतात. आपण त्या परदेशात निर्यात करून नफा कमवू, असा बहाणा करत एका इसमाला 17 लाख 70 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात नितीन रोमेश धकाते यांनी तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी लुसिया गारसिया, सुनीता विश्वास, शोभितराम व सागिर अहमद या आरोपीं विरोधात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्ट 66 सी, 66 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 10-04-2022 यादरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून घडला. तक्रारदार नितीन धकाते हे पुणे विमानतळावर देखभाल विभागाचे डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत आहे.

नक्की घटना काय ?

नितीन धकाते यांच्याशी अमेरिकेतील फ्लोरिडा येथुन बोलत असल्याचे सांगत लुसिया गारसिया हिने मैत्री केली. अमेरिकेतील नोर्वार्ड सिडस नावाची कंपनी कॅन्सरसाठी औषध बनवत असल्याचे तिने सांगितले. त्यासाठीचे हर्बल सीडस हे भारतात स्वस्तात मिळत आहे, ते आपण परदेशात निर्यात करु त्यात खूप फायदा होईल असे सांगून तिने इतर आरोपींसोबत संगनमत केले. तक्रारदार यांना हर्बल सीडस पाठवण्याचे बहाण्याने त्यांच्याकडून वेगवेगळया बँक खात्यावर ऑनलाईन 17 लाख 70 हजार रुपये घेवून, त्यांना तीन किलो 600 ग्रॅम हर्बल सीडस म्हणून कुठल्यातरी झाडाच्या बिया खरेदी करुन पाठवल्या. हा प्रकार नायजेरियन फ्रॉड सारखा असून याबाबत आरोपींची शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...